Alandi : वारकऱ्यांना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी डस्ट मशिनद्वारे फवारणी तर शहरातील महत्वाच्या 120 ठिकाणी सीसीटीव्ही

एमपीसी न्यूज -संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रे निमित्त (Alandi)आळंदी नगरपरिषद सज्ज होऊन विविध कामे शहरात करताना दिसत आहेत.

यात्रे दरम्यान वारकऱ्यांना धुळीचा त्रास होवू नये याकरिता आळंदी नगरपरिषद मार्फत पिंपरी चिंचवड मनपाच्या सहाय्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर अँटी डस्ट मशीन द्वारे पाणी फवारणी करण्यात येत आहे .तसेच नदी घाट, मंदिर परिसराच्या येथे कर्मचारी झाडूच्या सहाय्याने पूर्ण पणे स्वच्छता करताना दिसून येत आहेत.

वारकरी भाविकांसाठी टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय:-
1)शाळा क्रमांक 4(पोलीस यांचे राहण्याच्या ठिकाणी) ,2)झाडी बाजार(पार्किंग),3)आळंदी चाकण (Alandi)रस्ता(श्री ज्ञानेश्वर विद्यालय समोर),4)वडगांव रोड (भैरवनाथ चौक),5)च-होली रस्ता(शाळा क्र.4च-होली रस्ता),6)वाय जंक्शन(एस टी स्टॅण्ड),7)वडगांव रोड(चाळीस फुटी रोड),8)पुणे आळंदी रस्ता(युनियन बँके समोर),9)आळंदी देहू रस्ता(साखरे महाराज पेट्रोल पंपासमोर) या नऊ ठिकाणी टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

Pimpri : नद्यांच्या प्रदूषणाबाबत ‘एमपीसीबी’ची महापालिकेला नोटीस

 

मागील वर्षी सोने चोरी च्या घटना मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेवून आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनात खाली शहरातील महत्वाच्या 120 ठिकाणी नगरपरिषद मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आसून या मुळे यात्रेत येणाऱ्या प्रत्येकावर करडी नजर ठेण्यास पोलीस विभागास मदत होणार आहे. त्यामुळे आळंदी नगरपरिषदे च्या या स्तुत्य उपक्रमा. मुळे कार्तिकी यात्रेतील चोरीच्या घटना रोखण्यास मोठी मदत मिळणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.