Pune : आजही रसिकांची झोप उडवते ‘ही’ ग्लॅमरस अभिनेत्री

एमपीसीन्यूज : ‘जो जीता वोही सिकंदर’ या ९२ साली आलेल्या चित्रपटातून एका अत्यंत ग्लॅमरस अभिनेत्रीने पडद्यावर पदार्पण केले. नृत्यांगना प्रोतिमा बेदी आणि अभिनेते कबीर बेदी यांची कन्या पूजा बेदी यात तरुणांच्या दिलाची धडकन बनली. आजही ती रसिकांची झोप उडवते. आज तिचा ५० वा वाढदिवस, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

बॉलिवूडमध्ये अनेक ग्लॅमरस अभिनेत्री आजवर आल्या. त्यांच्यातील एक म्हणजे पूजा बेदी. अभिनेता आमिर खानच्या ‘जो जीता वोही सिकंदर’मधील लाल फ्रॉक उडवणारी पूजा आणि तिची ती मेरलिन मन्रोसारखी अदा आजही रसिकांच्या लक्षात आहे. पूजा आज वयाच्या ५० व्या वर्षीही प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते.

‘जो जिता वहीं सिकंदर’ या चित्रपटातून पूजाला विशेष प्रसिद्धी मिळाली. मात्र, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहिली. विशेष म्हणजे पूजा बऱ्याच वेळा तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त कारणांमुळेच चर्चेत राहिली.

यात पूजाची पर्सनल लाईफ हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. पूजाने आतापर्यंत पाच जणांना डेट केल्याचं म्हटलं जातं.

दरम्यान, सतत चर्चेत राहणारी ही अभिनेत्री वयाच्या ५० व्या वर्षीदेखील सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे अनेक वेळा तिला टीकेचं धनीदेखील व्हावं लागलं आहे.

पूजाने वयाच्या ४८ व्या वर्षी व्यावसायिक मानेक कॉन्ट्रॅक्टरशी लग्न केलं असून मानेक हा पूजाचा शाळेतील मित्र असून तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे.

पूजाची मुलगी आलिया फर्निचरवालादेखील बॉलिवूडमध्ये येणार असल्याची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.