Pune Farmer News : पुण्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात (Pune Farmer News) अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दीपक धोंडीबा खाटपे (वय 37) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वेल्हे तालुक्यातील वाजेघर बुद्रुक या ठिकाणी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. हा अपघात सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडला. वेल्हे पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी दीपक हा पायी चालत वाजेगर बुद्रुक येथून खाटपेवाडी गावाकडे निघाला होता. यावेळी एका अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये दीपक गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला वेल्हा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Property Transfer Charges : वाढीव मालमत्ता हस्तांतरण शुल्क रद्द करण्याची मागणी

दरम्यान, या घटनेनंतर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात (Pune Farmer News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक देऊन पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध आता पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.