Sushma andhare : माझा नटी उल्लेख केल्यानंतर गुलाबराव पाटलांवर कारवाई का नाही? सुषमा अंधारे यांचा चाकणकरांना सवाल

एमपीसी न्यूज : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी अपशब्द वापरल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांना नोटीस पाठवली. मात्र याच रूपाली चाकणकर यांनी ज्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील (Sushma andhare) यांनी माझ्यावर आक्षेपार्य शब्दात टीका केली तेव्हा त्यांनी कारवाई का नाही केली? त्यांना नोटीस का नाही पाठवली असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारलाय. यासाठी मी रूपाली चाकणकर यांना दोन वेळा फोनही केला होता. मात्र त्यांनी माझ्या फोनला प्रतिसाद दिला नाही असा दावा माझ्या फोनला प्रतिसाद दिला नाही असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. 

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच आक्रमक झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आंदोलन केली जात आहे. तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाने ही अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत त्यांना नोटीस पाठवली. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनीही माघार घेत दिलगिरी व्यक्त केली.

Property Transfer Charges : वाढीव मालमत्ता हस्तांतरण शुल्क रद्द करण्याची मागणी

दरम्यान हाच धागा पकडून सुषमा अंधारे यांनी आता रूपाली चाकणकर यांना कोंडीत पकडला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील माझ्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी रूपाली चाकणकर अध्यक्ष असलेल्या राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस का पाठवली नाही असा प्रश्न त्यांनी विचारला.(Sushma andhare) सुप्रिया सुळे या मित्र पक्षाच्या आहेत म्हणून नव्हे तर बाई म्हणून त्यांच्यावर झालेली टीका योग्य नाही असे मला वाटते. पण माझ्यावर देखील जेव्हा अशीच टीका झाली होती तेव्हा राज्य महिला आयोगाने नोटीस द्यायला हवी होती असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.