Baramati Loksabha : पवारांची कोंडी करण्यासाठी शिंदे गटाची रणनीती, विजय शिवतरे यांना पक्षाचे प्रवक्ते पद

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Baramati Loksabha) बालेकिल्ला असणारा बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांचा पराभव  करण्यासाठी शिंदे गटाने आता रणनीती आखली आहे. काहीही करून यंदा बारामती लोकसभा जिंकायचीच असा निश्चय भाजपने आणि शिंदे गटानेही केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते असलेल्या विजय शिवतरे यांनी नुकतीच बारामती लोकसभा मतदारसंघ लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर आता शिंदे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकत विजय शिवतारे यांना बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते पद देण्यात आले आहे.

भाजप सरकारमध्ये यापूर्वी विजय शिवतारे मंत्री राहिले आहेत. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या विषयी नाराजी व्यक्त करत विजय शिवतारे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. सुतारे यांच्याकडे सध्या कोणतेही संसदीय पद नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

Sushma andhare : माझा नटी उल्लेख केल्यानंतर गुलाबराव पाटलांवर कारवाई का नाही? सुषमा अंधारे यांचा चाकणकरांना सवाल

विजय शिवतारे मागील काही दिवसांपासून चांगलेच सक्रिय झाले (Baramati Loksabha) आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष केले आहे. जर सर्व पक्ष नेत्यांना मी योग्य वाटलो आणि कार्यकर्त्यांची ही तयारी असेल तर बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी मी तयार असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणत्याही एका परिवाराचा सातबारा नाही येथील जनतेने ठरवले तर निश्चितपणे या मतदारसंघातही परिवर्तन होऊ शकते असं ते नुकताच म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही जबाबदारी शिवतारे कशाप्रकारे पार पाडतात हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.