Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा

एमपीसी न्यूज : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (Baramati) काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

LokSabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी

महायुतीच्या माध्यमातून या अगोदरच रायगड मतदारसंघातून सुनिल तटकरे तर शिरुर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील या दोन उमेदवारांची अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती.

आणि आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांची उमेदवारी तर (Baramati) त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.