Chandrakant Patil : शिवसेना आज पहिल्यांदा फुटली का? खोके संस्कृती कोणी सुरू केली? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना विनाकारण टार्गेट केले जात आहे. पक्षात घुसमट होत असल्याने आणि तत्त्वांना अनुसरून काम होत असल्याने शिवसेनेतून आमदार बाहेर पडले. (Chandrakant Patil) असं असतानाही विनाकारण त्यांना खोका संस्कृतीवरून टार्गेट केलं जात आहे. शिवसेना आज पहिल्यांदा फुटली का? महाराष्ट्रात खोके संस्कृती कोणी रुजवली? असा प्रश्न विचारात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

चंद्रकांत पाटील यांची आज पुण्यातील पत्रकार भवन या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडली. या ठिकाणी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.(Chandrakant Patil) चंद्रकांत पाटील म्हणाले महाराष्ट्रात आमदार फोडण्याची खरेदी करण्याची संस्कृती कोणी सुरू केली? छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांना शिवसेनेतून कोणी बाहेर काढले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी खोका नव्हे तर पेटी हा शब्द होता असा आरोप ही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

Sushma andhare : माझा नटी उल्लेख केल्यानंतर गुलाबराव पाटलांवर कारवाई का नाही? सुषमा अंधारे यांचा चाकणकरांना सवाल

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्या विषयी विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याला कोणाचीही सहमती नाही.(Chandrakant Patil) खुद्द मुख्यमंत्री एका शिंदे यांनीच सत्तारांनी माफी मागावी असे सांगितले आहे. त्यानंतर सत्तार यांनी माफी देखील मागितली आहे. त्यामुळे हा विषय आता संपवला गेला पाहिजे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.