Pune : मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज : मुलीची भेट घेण्यासाठी निघालेल्या एका (Pune) वडिलांवर काळाने अचानक घाला घातला. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील मलठन रस्त्यावरील रावडेवाडी हद्दीत हा अपघात झाला. शिवाजी मारुती जाधव (वय 65) असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शिवाजी जाधव हे मूळचे पिंपरखेडचे रहिवासी आहेत. शिक्रापूर येथे राहणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी ते दुचाकी निघाले होते. दरम्यान अष्टविनायक महामार्गावर रावडेवाडी जवळ यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

यामध्ये जाधव यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला. यात गंभीर जखमी झाल्याने शिवाजी जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

Baramati : बारामतीतील 15 लॉजवर पोलिसांची छापे; महाविद्यालयीन प्रेमीयुगुलांचे धाबे दणाणले

अष्टविनायक रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने (Pune) या मार्गावरून वाहन चालक वर्धा मार्गाने जात आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्यावर गतिरोधक उभारावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.