Pune : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री विश्वजीत कदम निरीक्षक

एमपीसी न्यूज – काँग्रेसतर्फे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री विश्वजित कदम यांची (Pune)निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ते स्वतः तर पुण्यात निवडणूक लढविणार नाही ना, असा प्रश्न काँग्रेसतर्फे इच्छुक असलेल्या 20 उमेदवारांना पडला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक (Pune)असलेल्या उमेदवारांना काँग्रेसने राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश सरचिटणीस संजय बालुगडे आणि ॲड. अभय छाजेड, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी या चार इच्छुक उमेदवारांना अन्य लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Maval : ‘नमो चषक 2024’चे 12 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजन

तर पुणे लोकसभेसाठी माजी राज्यमंत्री, आमदार विश्वजीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे आणि मोहन जोशी यांनी पक्षाकडे इच्छुक म्हणून नाव दिले आहे. पण, धंगेकर यांना सातारा लोकसभा, छाजेड यांना हातकणंगले लोकसभा, संजय बालगुडे यांना माढा लोकसभा तर मोहन जोशी यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबादीर देण्यात आली आहे.

पुण्याची जबाबदारी माजी मंत्री, आमदार विश्वजीत कदम यांच्याकडे देण्यात आली आहे. मतदरासंघाची बांधणी करण्याची जबाबदारी या सर्वांना आहे. इच्छुक उमेदवारांना पुण्यापासून बाहेर ठेवल्याने आणि कदम यांना पुण्याची जबाबदारी दिल्याने कदम पुन्हा उमेदवार असणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. कदम यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविली आहे. त्यावेळी खासदार अनिल शिरोळे यांनी त्यांचा पराभव केला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.