Pune Ganpati Visarjan Live 2023 : परंपरेनुसार मानाच्या पहिल्या गणपती पाठोपाठ दुसऱ्या गणपतीचेही झाले विसर्जन

एमपीसी न्यूज : आज अनंत चतुर्दशी दिवशी (Pune Ganpati Visarjan Live 2023 )पुण्यातील विसर्जन सोहळ्याला चौकाचौकात सुरुवात झाली आहे. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. तर तरुणाईने ढोल ताशाच्या गजरात ठेका धरला आहे. या विसर्जन मिरवणुकीचे प्रत्येक अपडेट एमपीसी न्यूजवर जाणून घ्या – 

5.10 वाजता : मानाच्या दुसऱ्या गणपतीचे विसर्जन 

पाच मानाच्या गणपतींपैकी दुसरा म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाने आज सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी मूर्तीचे विसर्जन पूर्ण केले.


4.35 वाजता : मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन 

पाच मानाच्या गणपतींपैकी  पहिल्या श्री कसबा गणपती मंडळ ट्रस्टच्या मूर्तीचा विसर्जन विधी संपन्न झाला आहे. नदी पात्रातील हौदात पारंपरित पद्धतीने 4 वाजून 35 मिनिटांनी विसर्जन करण्यात आलं.


4.10 वाजता : मानाचा दुसरा गणपती अलका चौकात दाखल 

अत्यंत शिस्तीचे आणि वेळेचे प्रायोजन करत मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी अलका टॉकीज चौकात दाखल झाला आहे.


4 वाजता : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला प्रारंभ –

पुण्यातील सर्वात श्रीमंत गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. ‘श्री गणाधीश रथात दिमाखात हा सोहळा सुरू झाला आहे.


3.30 वाजता : पुण्यात जोरदार पावसाळा सुरुवात 

नेहमीप्रमाणे बाप्पाच्या विसर्जनाला पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वत्र जोरदार वाऱ्यासह पावसाची दमदार सुरुवात आहे.


3.11 वाजता : पोलिसांची मोठी फौज तैनात  (Pune Ganpati Visarjan Live 2023 )

चेन स्नॅचिंग विरोधी युनिट्स, दंगल नियंत्रण पोलीस आणि बॉम्बशोधक पथके आणि क्विक रिस्पॉन्स टीम ही पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात करण्यात आली आहेत. लहान मुले आणि वृद्धांसाठी हेल्प डेस्क उभारण्यात आले आहेत आणि रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी ट्रॅक ठेवण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.