Pune News : ढोल ताशांच्या गजरात तरुणाई नाचताना आली रुग्णवाहिका आणि घडले पुणेकरांच्या माणुसकीचे दर्शन

एमपीसी न्यूज : ढोल ताशांच्या गजरात (Pune News) आपल्या लाडक्या गणरायचा विसर्जन सोहळा सर्वत्र पार पडत आहे. सर्वत्र भाविकांची गर्दीच गर्दी दिसून येत आहे. अशातच पुण्यात माणुसकीचे दर्शन घडवणारा प्रसंग घडला. बेलगाम चौकात भाविकांनी तत्परतेने एक रुग्णवाहिकेला रस्ता करून दिल्याचा कौतुकस्पद क्षण समोर आला आहे. 

बेलबाग चौकामध्ये गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा नाद घुमत होता. तरुण मंडळी नाचत होती आणि भाविकांच्या गर्दीचा पुर लोटला असता अचानक रुग्णवाहिकेचा आवाज येऊ लागला.

 

एकीकडे रुग्णवाहिकेला जागा करून देण्यासाठी (Pune News) पोलिस प्रयत्न करत असताना ढोल ताशाचा आवाज थांबला आणि तरुण मुलांचा ठेकाही थांबला; लोकांची गर्दी दोन भागात विभागली अन तत्परतेने रुग्णवाहिकेला वाट मोकळी झाली.

या दरम्यान एका छतावरून रेकॉर्ड झालेला व्हिडिओ सर्वत्र पसरला आणि पुणेकरांचे कौतुक होऊ लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.