Ganeshotsav 2023 : घरच्या लाडक्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप; चिमुकल्यांना सोसेना गणरायाचा विरह

एमपीसी न्यूज – शहरात सर्वत्र घरातील (Ganeshotsav 2023 ) गणेशाचे उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा सुरू झाला असून नदीघाट, कृत्रिम तलाव आणि फिरते विसर्जन केंद्र या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळते.

मागील आठवड्यात गणरायाचे आपल्या घरी आगमन झाले आणि सर्वत्र चैतन्याचे, भक्तिमय वातावरण निर्माण झाले. गेली अकरा दिवस घरच्या गणरायाची मनोभावे पूजा केली. श्रद्धेने जोपासना केली आणि बघता बघता गणरायाला निरोप देण्याचा दिवस उजाडला.

आज अनंत चतुर्थीचा दिवस सर्वत्र आनंदमय वातावरणात गणरायाला निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’, असा जयघोष ऐकायला मिळतो आहे. शहरातील महत्वपूर्ण विसर्जन घाटावर, कृत्रिम विसर्जन हौद आणि फिरते विसर्जन केंद्र अशा ठिकाणी लोकांनी गणरायाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसते.

Pune Ganpati Visarjan Live 2023 : वेळेचे प्रायोजन राखत मानाचा दूसरा गणपती अलका टॉकीज चौकात दाखल

अनेक ठिकाणी गणरायाला निरोप देताना चिमुकल्यांनी (Ganeshotsav 2023 ) हंबरडा फोडल्याचे चित्र पाहायला मिळते. गेल्या अकरा दिवसात गणरायाच्या सहवासाने मंत्रमुग्ध झालेल्या चिमुकल्यांचे गणरायाला निरोप देताना कंठ दाटून आल्याचे दिसले.

महापालिकेच्या वतीने विसर्जन घाटावर मोठ्याप्रमाणात सेवा सुविध उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कृत्रिम विसर्जन कुंड, निर्माल्य संकलन कुंड, मूर्ती संकलन केंद्र, यासह जीवरक्षक, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने ठिकठिकाणी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.