Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली 21 नवीन वाहने

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड (Chinchwad) पोलिसांनी मंगळवारी (दि. 26) आणखी 21 नव्या कोऱ्या कार मिळाल्या आहेत. शासनाकडून ही वाहने देण्यात आली आहेत. याचा पोलीस पेट्रोलिंग आणि एकंदरीत कामगिरीसाठी चांगला फायदा होणार आहे. त्यात गणेशोत्सवात ही वाहने मिळाल्याने बाप्पा पावल्याची भावना पोलिसांमध्ये आहे.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात 18 पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन ते तीन पोलीस चौक्या आहेत. प्रत्येक चौकी अंतर्गत बिट मार्शलीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना गस्तीसाठी दुचाकी देण्यात आली आहे. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांना गस्तीसाठी चारचाकी वाहने देण्यात आली आहेत.

Chinchwad : कृषी पर्यटनातून शाश्वत विकास ही काळाची गरज – पांडुरंग तावरे

पोलीस आयुक्तालयात एकूण 140 चारचाकी (लाईट व्हॅन, कार, बस), 183 दुचाकी अशी एकूण 323 वाहने आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणारा परिसर आणि लोकसंख्या याच्या तुलनेत ही (Chinchwad) वाहने कमी पडत होती. परिणामी पोलिसांच्या गस्तीवर देखील मर्यादा येत होत्या.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शासनाकडे वाहनांची मागणी केली होती. मागील काही महिन्यांपासून ही मागणी प्रलंबित होती. आता पिंपरी चिंचवड पोलिसांना नवीन वाहने मिळाली आहे. शहरात दाखल झालेल्या 21 नव्या वाहनांमधून प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी प्रत्येकी एक वाहन दिले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.