Alandi : वाघजाई माता मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम; गणेशोत्सवासाठी जमा केलेल्या वर्गणीतून वाटले 100 हेल्मेट

एमपीसी न्यूज – आळंदी येथील वाघजाई माता मित्र मंडळाने (Alandi) गणेशोत्सवात स्तुत्य उपक्रम राबविला आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 100 दुचाकीस्वारांना मंडळाच्या वतीने हेल्मेट वाटप करण्यात आले. दिघी आळंदी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांच्या हस्ते या हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

रस्ते अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे होतात. त्यातही ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नाहीत, अशांच्या मृत्यूचे प्रमाणत सर्वाधिक आहे. हेल्मेट घातले असते, तर जीव वाचला असता, अशा प्रकारचे निष्कर्ष अनेक अपघाताच्या तपासात समोर येतात. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. याबाबत आळंदी येथील वाघजाई माता मित्र मंडळाने स्तुत्य उपक्रम राबवला आहे.

Ganeshotsav 2023 : घरच्या लाडक्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप; चिमुकल्यांना सोसेना गणरायाचा विरह

मंगळवारी (दि. 27) दिघी आळंदी वाहतूक विभागाचे अधिकारी, अंमलदार (Alandi) आणि वाघजाई माता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देहूफाटा चौकामध्ये हेल्मेट वापरण्याबाबत फलक दाखवून जनजागृती. 100 दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

वाघजाई माता मित्र मंडळाने लोक वर्गणीतून गणपती उत्सव साजरा केला. या वर्गणीमधून शिल्लक राहिलेल्या पैशातून 100 हेल्मेट विकत घेऊन त्याचे वाटप केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.