Pune : जीएसटी कस्टम्स व हॉकी लव्हर्स यांची उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल; मध्य रेल्वे संघाचीही विजयी घोडदौड

एमपीसी न्यूज – जीएसटी कस्टम्स, पुणे, (Pune)हॉकी लव्हर्स क्लब आणि सेंट्रल रेल्वे क्लब पुणे क्रीडा प्रबोधिनीमध्ये मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या एम. जे चषक तिसरी निमंत्रित हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी निश्चित केली.

उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेल्या सर्व संघाने (Pune)आतापर्यंत अपराजित राखले आहे.धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

Pimpri : देहूरोड कॅन्टोन्मेंटचा कचरा पिंपरी-चिंचवडमध्ये नको

जीएसटी कस्टम्स, पुणे संघाने हॉकी लव्हर्स अॅकॅडमीचा (HLS) 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अनिकेत गुरव (20वे) आणि अब्दुल सलामानी (55वे) यांनी प्रत्येकी एक गोल केला तर स्टीफन स्वामी (5वे, 42वे) आणि बी. फेलिक्स (23वे, 59वे) यांनी दुहेरी गोल केले. हॉकी लव्हर्स अॅकॅडमीसाठी (एचएलए) फजर शेख (19 वे) आणि सरयाज आलम (37 वे) यांनी गोल करीत चांगली लढत दिली. तथापि, शेवटी जीएसटी कस्टम्सने विजय मिळविला.

साखळी ब गटात उपांत्यपूर्व फेरीत हॉकी लव्हर्स क्लबने सलग दुसरा विजय मिळविताना मुंबई रिपब्लिकन्सचे आव्हान ३-१ असे संपुष्टात आणले. निखिल भोसले (१८ वे, ४१वे) आणि यश अंगीर (२३वे) याने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलात करीत संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. श्रीकिशन चौरसिया (४२व्या) याने पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करून मुंबई संघाकडून चिवट लढत दिली.रविवारी झालेल्या सामन्यात मध्य रेल्वेच्या पुण्याने मुंबई रिपब्लिकन्सचा 3-1 असा धुव्वा उडविला होता.

महिला विभागात, पीसीएमसी हॉकी अकादमी आणि मुंबई रिपब्लिकन या दोघांनी साखळी गटात जेजे अकादमीवर विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला.पीसीएमसी हॉकी अकादमीने सोमवारी दुपारी झालेल्या सामन्यात मुंबई रिपब्लिकन संघावर 4-0असा विजय मिळवला. शालीनी साकुरे (12वे) दुर्गा शिंदे (29वे) आणि सानिका माने (39वे, 53वे) यांनी केलेले दोन गोल विजयासाठी आणि साखळी गटामध्ये अव्वल होण्यासाठी पुरेसे होते.

साखळी अ गटातील लढतीत यजमान एक्सलन्सी हॉकी अकादमी आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी प्रत्येकी एक गुण घेताना पूर्ण लढतील 0-0 अशी बरोबरी स्वीकारली.

निकाल-

जीएसटी कस्टम पुणे: 6 (स्टेफन स्वामी 5वे, 42वे, अनिकेत गुरव 20वे; फेलिक्स 23वे, 59वे; अब्दुल सलामानी 55वे) वि.वि.हॉकी लव्हर्स अकादमी: २ (फजर शेख १९वे; सरयाज आलम 37वे).

हॉकी लव्हर्स क्लब: 3 (निखिल भोसले 18वे, 41वे; यश अंगीर 23वे ) वि.वि मुंबई रिपब्लिकन: 1(श्रीकिशन चौरीसिया ४२वे ).

एक्सलन्सी हॉकी अकादमी वइ.वि रोव्हर्स अकादमीकडून पुढे चाल

महिला, विभाग एक्सलन्सी हॉकी अकादमी बरोबरी वि. क्रीडा प्रबोधिनीसह ०-०

पीसीएमसी अकादमी: 4 (शालीनी साकुरे 12वे ; दुर्गा शिंदे 29वे; सानिका माने ३९वे, ५३वे) वि.वि मुंबई रिपब्लिकन: 0.

रविवारचे निकाल

हॉकी लव्हर्स क्लब: 5 (यश अंगीर 9वे , 52वे ; निहाल गोरटकर ३४वे ; स्वप्नील गरसुंद ३५वे; सिद्धार्थ गरसुंड 58वे ) वि.वि. किड्स क्लब: 1 (आकाश सावंत 48वे )

मध्य रेल्वे पुणे: 3 (श्रेयश डी 29वे ; हरीश शिंगाडी 47वे, गणेश पाटील 50वे ) वि.वि मुंबई रिपब्लिकन: 1(सौरभ मयेकर 40वे )

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.