Chinchwad : ऑनलाईन टास्क, 95 बनावट बँक खाती, 200 कोटींचा व्यवहार; गुन्हे शाखेने केला आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज : ऑनलाईन रिव्हीव्यू, रेटींग असे वेगवेगळे टास्क (Chinchwad) देऊन त्याद्वारे नागरिकांना फसवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये पोलिसांनी 17 गुन्हे उघडकीस आणत त्याद्वारे तब्बल 95 खोटी बँक खाते देखील प्रकाशात आणली आहेत. ज्याद्वारे 200 कोटी रुपयांचा फसवणूकीचा व्यवहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट चारच्या पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे.

14 अटक आरोपींची नावे –

1)चिंतन शशिकांत फडके (वय-35 रा. इंदौर, मध्यप्रदेश )

2) ब्रजराज रामरतन वैष्णव (वय 18 भिलवाडा, राजस्थान)

3) सुंदरदास चेतनदास सिंधी (वय 24 रा. गुलाबपुरा, राजस्थान)

4) राजेश भगवानदार करमानी, (वय 26 रा. अजमेर, राजस्थान)

5) मोहम्मद रशिद चांद मोहम्मद (वय 47 रा. अजमेर, राजस्थान)

6) अभिषेक सत्यनारायण पाराशर ( वय 24 रा- मिलवाडा, राजस्थान)

7) आशिष प्रल्हाद राय जाजु (वय 35 रा कोंढवा, पुणे)

8) मोहम्मद रौफ मोहम्मद रशिद ( वय 24 रा.अजमेर, राजस्थान )

9) नवीनकुमार नेवन्दराम आसनाणी, वय 40 रा.मिलवाडा, राजस्थान)

10) विकास सत्यनारायण पारिख (वय 29 रा, मिलवाडा, राजस्थान)

11) सुरेश गोवर्धनदास सिंधी ( वय 32 रा- गुलाबपुरा, राजस्थान)

12) गौरव महावीर सेन (वय 31 रा- राजस्थान)

13) ललित नवरतनमल पारिक, (वय 33 रा.राजस्थान)

14) मनिष ऋषिकेश वैष्णव (वय 33 रा. मिलवाडा, राजस्थान)

हा गुन्हा गंभीर व तांत्रिक स्वरुपाचा असल्याने गुन्हे शाखा युनिट-4 चे अधिकारी  (Chinchwad) व अंमलदार यांनी या गुन्ह्यात फिर्यादी यांनी ज्या विविध बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले; त्या बँक अकाउंट बाबत माहिती घेतली. तांत्रिक विश्लेषण करुन यातील आरोपींचा शोध घेतला. एकूण 14 आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे. यासाठी दोन पथके तयार करुन रवाना करण्यात आली. या पथकांनी मध्य प्रदेश राज्यातील इंदौर, रतलाम, भोपाळ, राजस्थान राज्यातील जयपुर, उदयपुर, भिलवाडा गुजरात राज्यातील वडोदरा, बिहार राज्यातील पटणा येथून अटक केली आहे.

Pune : जीएसटी कस्टम्स व हॉकी लव्हर्स यांची उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल; मध्य रेल्वे संघाचीही विजयी घोडदौड

असे अडकवले जात होते नागरिकांना –

आरोपींनी यामध्ये तीन स्तरीय पद्धतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून यामध्ये पहिल्या स्तरावरील आरोपी हे गरीब गरजू व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांच्या नावे वेगवेगळ्या खाजगी बँकेत अकाऊंट व फर्म तयार करत होते. दुसऱ्या स्तरावर आरोपी हे पहिल्या स्तरावर तयार केलेले बँक अकऊंट व किट चेकबुक व इंटरनेट बँकिंग विकत घेत होते. तिसऱ्या स्तरावरील आरोपी हे ऑनलाईन टास्क देऊन त्याचा मोबदला देण्याचे पैशाचे आमिष दाखववून  पिडीतांशी व्हॉटसअॅप व टेलिग्राफद्वारे संपर्क साधून त्यांना आमिष दाखवून पिडीतांकडून पहिल्या स्तरावरील अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्सफर करुन घेत होते.

आरोपी हे अतिशय नियोजन पद्धतीने देशभरातील विविध मोठ्या शहरामध्ये जाऊन तेथे नोकरीच्या आमिषाने स्थानिक किवा त्यांच्यासह आणलेल्या व्यक्तीच्या नावाने गाळा भाडयाने घेऊन, शॉपॲक्ट, उद्यम / एम एस एम ई सर्टीफिकेट ऑनलाईन काढून फर्मच्या नावे वेगवेगळ्या खाजगी बँकांमध्ये करंट अकाउंट उघडत होते. ज्यामुळे संशय येणे देखील कठीण होते.

आरोपींकडून निष्पन्न झालेल्या विविध अकाउंटमधून जवळपास 200 कोटींच्या फसवणुकीचे व्यवहार झाले असून सर्व अकाउंट फ्रिज करुन त्यातील मनी ट्रेलचे विश्लेषण करुन फिर्यादींना पैसे परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींकडून (Chinchwad) आता पर्यत आर्थिक फसवणूक झाल्याचे 17 गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखा, युनिट-4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उप निरीक्षक गणेश रायकर, पोलीस उप निरीक्षक आबासाहेब किरनाळे, सहायक पोलीस उपनीरक्षक नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिसाळ, पोलीस हवालदार, प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आहे, पोलीस नाईक वासुदेव मुंढे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पो शिपाई प्रशांत सैद, सुखदेव गावंडे, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद,पोलीस उप निरीक्षक सागर पोमण, पोलीस हवालदार नागेश माळी, पोलीस शिपाई नितेश बिचेवार, पोपट हुलगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.