Talegaon Dabhade : जैन इंग्लिश स्कूल येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून जैन इंग्लिश स्कूल (Talegaon Dabhade)येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या दहावी उत्तीर्ण होऊन यशस्वी झालेल्या एकूण 13 बॅचेसच्या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा स्नेह मेळावा आनंदी वातावरणात संपन्न झाला.

स्वागत गीत आणि शालेय जीवनामध्ये घेऊन जाणारे विद्यार्थ्यांचे आनंददायी नृत्य हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

ज्ञान संस्कारेण मनुष्य शोभते या ब्रीद वाक्याने प्रेरित झालेला (Talegaon Dabhade)शाळेतून अनेक विद्यार्थी सक्षमपणे आपल्या जीवनात यशस्वी झाले. काही विद्यार्थी यशस्वी उद्योजक तर काही नोकरीमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. ही अभिमानाची गोष्ट जैन इंग्लिश स्कूलच्या रौप्य महोत्सवी वर्षाची खरी पावती ठरली आहे.

माजी विद्यार्थ्यांच्या वतीने निशांत बालगुडे या विद्यार्थ्याने आठवणीतील शाळेविषयी विचार मांडून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या बालपणीच्या सुखद क्षणांना उजाळा दिला तसेच *स्नेहा भेगडे या विद्यार्थिनीने* देखील जैन इंग्लिश स्कूल ही फक्त शाळा नाही तर प्रत्येक विद्यार्थी शिक्षक संचालक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक आदर्श परिवारच आहे असे सांगून आपले शालेय जीवनातील अनेक सुंदर क्षण आठवणी मनोगतातून व्यक्त केल्या.

Pune : जीएसटी कस्टम्स व हॉकी लव्हर्स यांची उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल; मध्य रेल्वे संघाचीही विजयी घोडदौड

शाळेचे चेअरमन प्रकाश ओसवाल यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शालेय जीवनातील क्षण हे मोत्याप्रमाणे असतात त्यांना आयुष्यभर अलगदपणे जपून ठेवताना शाळेशी सातत्याने जोडून राहा, भेटा ,बोला शाळा ही सदैव तुमचीच आहे असे विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा प्रेम दर्शवणारे भाव व्यक्त केले.

याप्रसंगी संचालक सदस्य दिलीप पारेख, किरण परळीकर, विलास शहा यांनी या सर्व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील, अनेक सुखद क्षण, प्रसंग, आपले अनुभव मनोगतातून व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा टकले जुनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका शुभांगी भोईर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापिका विजया शिंदे यांनी या स्नेह मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन केले. विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या शालेय आठवणींमध्ये रममान होण्यासाठी आपला जिव्हाळा प्रेम सदैव असाच जपण्यासाठी संपर्कात राहण्याचे आवाहन त्यांनी माजी विद्यार्थ्यांना केले.
या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता फाकटकर अनघा कुलकर्णी यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.