Cinema :आपण तेव्हाच मोठे होतो, जेव्हा आपले सहकारी मोठे होतात – प्रविण तरडे

एमपीसी न्यूज – शेतकरी तरूणांवर भाष्य करणारा (Cinema)‘नवरदेव Bsc Agri’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याच चित्रपटाला शुभेच्छा देत अभिनेते प्रविण तरडे यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

शेतकरी तरूणांना विवाहासाठी वधू मिळणं कठिण झालंय, या गहन प्रश्नाला धरून दिग्दर्शक राम खाटमोडे आणि लेखक विनोद वणवे हे दोन हरहुन्नरी तरूण समाजातील शेतकरी तरूणांच्या विवाहाचं सत्य मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. हा वास्तववादी विषया मांडणाऱ्या दोन तरूणांचं कौतुक प्रविण तरडे यांनी आपल्या पोस्टमध्ये केलं आहे.

‘नवरदेव Bsc. Agri’ या चित्रपटाचे दिग्दर्शक (Cinema)राम खाटमोडे आणि लेखक विनोद वणवे यांनी यापूर्वी प्रविण तरडे यांच्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे, आणि आता ते स्वतःचा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत.

 

तसेच या चित्रपटात तरडे यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिकाही साकारली आहे. त्यांच्या सहाय्यक दिग्दर्शकांसोबत त्यांच्याच चित्रपटात काम केल्याने अभिनमान वाटत आहे, अशा आशयाची पोस्ट आणि चित्रपटाचे मोशन पोस्टर त्यांनी सोशल मीडियावर केली. तरडे म्हणतात, ‘आपण खऱ्या अर्थाने तेंव्हाच मोठे होतो जेंव्हा आपले सहकारी पण मोठे होतात.

Talegaon Dabhade : जैन इंग्लिश स्कूल येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा

राम खाटमोडे आणि विनोद वनवे हे दोघंही माझे सहाय्यक दिग्दर्शक आज स्वतःचा सिनेमा करतायेत.. तो ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ..राम COEP चा विद्यार्थि आहे आणि विनोद हा रानडे इन्सट्यिट्यूटचा.. शिवाय दोघेही ग्रामिण भागातून आलेली शेतकरी कुटुंबातली पोरं.. त्यामुळे मातीतला अस्सलपणा सिनेमात ही उतरलाय.

दोघांनीही मोठा सामाजिक प्रश्न अगदी स्पष्टपणे मांडलाय.. 26 जानेवारी 2024 हा सिनेमा येतोय फक्त थियटर मधेच जावून पहा..’ आपल्या सहकाऱ्यांचं कौतुक करत हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचे आव्हानही केले. सध्या त्यांच्या आगामी ‘धर्मवीर 2’चे चित्रीकरण सुरू आहे.

 

या पोस्टमुळे प्रविण तरडे यांची सहकाऱ्यांना आपल्या प्रमाणेच प्रगतीपथावर जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याची एक सकारात्मक वृत्ती दिसून येते. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत कलेचं महत्त्व आणि कलेची जाण असलेले सच्चे कलाकार आजही आहेत, असं म्हणल्यास हरकत नाही.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.