Pune : तंत्र जाणल्यास गझल लिखाणात येईल सहजता -ॲड. प्रमोद आडकर

एमपीसी न्यूज – गझल हा काव्यप्रकार मोठा विलक्षण आहे. गझलेल्या केवळ दोन (Pune) ओळींमध्ये खूप मोठा आशय दडलेला असतो. गझलेचे तंत्र जाणून घेतले की लिखाणात सहजता येते. गझल हा काव्यप्रकार हळव्या मनाच्या व्यक्तींना प्रेमात पाडणार आहेअसे प्रतिपादन रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी केले.

रंगत संगत प्रतिष्ठानकरम प्रतिष्ठानसाहित्यदीप प्रतिष्ठान आणि ब्रह्मकमळ साहित्य समूहातर्फे ‘मराठी गझल : आकृती आणि आशय‘ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आज एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन ॲड. आडकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Today’s Horoscope 10 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

सुरुतीस मान्यवरांनी कवीगझलकार सुरेश भट यांना अभिवादन केले. कार्यशाळा आयोजनाविषयीची माहिती ज्योत्स्ना चांदगुडे यांनी प्रास्ताविकात दिली. ॲड. प्रमोद आडकर यांचे स्वागत विशाल राजगुरू यांनी केले.

उदघाटन सत्रानंतर आयोजित चर्चासत्रात भूषण कटककर यांनी नवोदित गझलकारांशी संवाद साधला.  ‘गझलेचे तंत्र‘ या विषयावर वैभव वसंतराव कुलकर्णी आणि दास पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या अखेरच्या सत्रात आयोजित मुशायरामध्ये अनिरुद्ध वासमकरनागेश नायडूएकानथ धनकेसंदीप मर्ढेकरगोकुळ सोनवणेप्रमोद खराडेविजय उतेकरपूजा फाटेसतीश मालवेप्रशांत पोरे यांचा (Pune) सहभाग होता. सूत्रसंचालन रेखा कुलकर्णी आणि वैशाली माळी यांनी केले. आभार विशाल राजगुरू यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.