Talegaon Dabhade : भविष्याचा दृष्टिकोन ठेवूनच विकासकामे झाली पाहिजेत – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज – वराळे गावामध्ये नागरिकीकरण वाढत आहे. मोठे (Talegaon Dabhade) गृहप्रकल्प उभारले जात आहेत. येथे येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्या दृष्टीने पक्के रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन अशी विकासकामे भविष्याचा दृष्टिकोन ठेवूनच झाली पाहिजेत, असे मत आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले. वराळे पाणी योजना आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभप्रसंगी ते बोलत होते.

वराळे ग्रामस्थांनी मला नेहमीच भरभरून साथ दिली. त्यामुळे गावाच्या विकासाला हातभार लावण्याची जबाबदारी माझी देखील आहे. विकासकामांत कुणी राजकारण आणू नये. आजपर्यंत ज्या विश्वासाने काम करण्याची संधी दिली तशीच पुढील काळात देखील द्याल अशी अपेक्षा बाळगतो. गावातील जी कामे करावयाची असतील ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करील असा विश्वास आमदार शेळके यांनी ग्रामस्थांना दिला.

Pune : तंत्र जाणल्यास गझल लिखाणात येईल सहजता -ॲड. प्रमोद आडकर

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, बाबुराव वायकर,बबनराव भोंगाडे, नारायण ठाकर,किशोर सातकर,राज खांडभोर,दिलीप ढोरे,दत्तात्रय पडवळ, इंदोरी सरपंच शशिकांत शिंदे,आंबी सरपंच माधुरी जाधव,माजी सरपंच संगीता घोजगे,सदस्य सारिका मांडेकर,अस्मिता मराठे, सीमा मराठे, मनीषा मराठे,गणेश मराठे,निलेश मराठे,बाबा घोजगे,विक्रम कलावडे, प्रदिप बनसोडे, ज्ञानेश्वर मराठे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत वराळे पाणीपुरवठा योजना सुमारे 31 कोटी 48 लक्ष रुपये निधी उपलब्ध 4 पाण्याच्या टाक्या भिसे कॉलनी येथे 5 लक्ष लि.,कोहिनूर सोसायटी येथे 9 लक्ष लि., तिरुमला सोसायटी येथे 5 लक्ष  लि.,वराळे गावठाण (Talegaon Dabhade) येथे 5 लक्ष लि. सुमारे 27 किलोमीटर अंतर्गत पाईपलाईन (वितरण व्यवस्था), 3.5 किलोमीटर मुख्य पाईपलाईन ही कामे करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.