Pune : भवानी पेठेत जुन्या वादातून तरुणावर हत्याराने वार

एमपीसी न्यूज – जुन्या वादातून  तरुणाच्या डोक्यावर आणि पाठीवर हत्याराने वार करून ( Pune) गंभीर जखमी केले. ही घटना भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात व्यापारी तरुण मंडळाजवळ घडली.

Pimpri : संघटनेतला जुना मित्र बनला मुख्यमंत्री… भावेन पाठक यांनी साजरा केला आनंदोत्सव

सैफ महम्मद हुसेन मेमन (वय 29 , रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून फैजान शान शेख आणि झिशान शान शेख (रा. हरकानगर, कासेवाडी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा सैफ महम्मदच्या भावासमवेत यापूर्वी वाद झाला होता. या वादातून आरोपींनी रविवारी रात्री सैफ महम्मदच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार ( Pune) केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.