Pune : आयात निर्यात वाढविण्यासाठी उद्योग व्यवसाय व्यापार परिषद संपन्न

एमपीसी न्यूज – आयात निर्यात वाढविण्यासाठी उद्योग व्यवसाय (Pune) व्यापार परिषद नुकतीच संपन्न झाली. या परिषदेमध्ये वाणिज्य मंत्रालय भारत सरकार महानिर्देशक, डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड वगैरेचे उच्चस्तरीय प्रतिनिधी अनुक्रमे रजत श्रीवास्तव, वरूण सिंग, राहुल पोपट, शेर सिन्हा मुखर्जी वगैरे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातून चाकण इंडस्ट्रीज फेडरेशनचे कार्याध्यक्ष जैन, सेक्रेटरी दिलीप बटवाल, पिंपरी चिंचवड इंडस्ट्रीज फेडरेशनचे अध्यक्ष गोविंद पानसरे उपस्थित होते. संचालक रमाकांत पोतदार उपस्थित होते.एक्सपोर्ट कौन्सिल चे संचालक रजत श्रीवास्तव यांनी सध्या स्थितीतील जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या निर्यातीच्या संधीचे सविस्तर विश्लेषण केले. वरूण सिंग यांनी केंद्र सरकारच्या निर्यात विभागातर्फे फिर्यादीसाठी दिल्या (Pune) जाणाऱ्या इन्सेंटिव्ह यासंदर्भात सोदाहरण माहिती सांगितली व त्यामुळे उद्योग व्यापारात निर्यातीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत असे विषद केले.

 

वक्त्यांनी निर्यातीसाठी मालाची किंमत कशी करता येईल, निर्याती मधील उपलब्ध विमा संरक्षण द्वारे दिले जाणारे फायदे जलमार्ग द्वारे निर्यातीच्या संधी विविध देशांमध्ये कोणत्या मालाला संधी उपलब्ध आहेत याबाबत सविस्तर विवेचन केले.

Alandi : इंद्रायणी घाटावर ‘विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा’ नामस्मरणात योगा मेडिटेशन सोहळा पार

याप्रसंगी गोविंद पानसरे यांनी पुणे जिल्ह्यात निर्यातीसाठी इंटिग्रेटेड मल्टी लॉजिस्टिक पार्क जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारावा. पुणे जिल्ह्यातील उद्योगाची निर्यात क्षमता चाकण, रांजणगाव, तळेगाव, पिंपरी चिंचवड सॉफ्टवेअर पार्क वगैरेंना निर्यातीला चालना देण्यासाठी विशेष कार्गो लॉजिस्टिक एअरपोर्ट उभारणी भविष्यात केली जावी अशी गोविंद पानसरे यांच्यावतीने केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.