Alandi : डॉ. धनंजय मुंडे यांनी पीएचडी पदवी संपादन केल्याने आळंदी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

एमपीसी न्यूज : आळंदी शहरातील इंद्रायणीनगर येथे 1 मार्च रोजी डॉ. धनंजय मुंडे यांना (Alandi) स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत डॉ. लतिका अजबानी गायकवाड ( सहयोगी प्राध्यापक, नाशिक) यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली, “Impact of consumer ethnocentrism and brand equity on consumer buying intentions towards personal health care products in the Maharashtra” या शीर्षकासह वाणिज्य विषयामध्ये विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे.

डॉ. धनंजय मुंडे सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. मुंडे यांच्या या पी.एच.डी. प्रबांधातून ग्राहक, विक्रेते, उत्पादक आणि सरकार यांना वैयक्तिक आरोग्य सेवा उत्पादनांच्या क्षेत्रातील गुणात्मक्ता सुधारण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परदेशी उत्पादनांशी स्पर्धा करण्यासाठी मदत होईल.

Pune : आयात निर्यात वाढविण्यासाठी उद्योग व्यवसाय व्यापार परिषद संपन्न

डॅा. धनंजय मुंडे यांनी पी एच डी पदवी संपादन (Alandi) केल्याने त्यांचा आळंदी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष राहूल चिताळकर पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, पोलिस अधिकारी मच्छिंद्र शेंडे, भाऊसाहेब घुंडरे, रोहिदास मुंगसे, रमाकांत आघाव, आदित्य काटे आदी मान्यवर उपस्थित होते. याबाबतची माहिती सचिन गिलबिले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.