Pune : रंगपंचमीलाही खडकवासला जलाशयाचे हिंदु जनजागृती समितीतर्फे मानवी साखळीद्वारे रक्षण

एमपीसी न्यूज – हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ, आणि समविचारी संघटना (Pune) यांच्या वतीने आयोजित ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहीमेची आज (रविवारी) सांगता झाली. खडकवासला जलाशयातील पाणी साठ्याचे हिंदु जनजागृती समितीने मानवी साखळीद्वारे रक्षण केले.

प्रतिवर्षी धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी अनेक युवक-युवती रंग खेळून खडकवासला जलाशयात अंघोळ करण्यासाठी येत असतात. त्यांना रोखण्यासाठी, तसेच जलाशयाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी समितीच्या वतीने ही मोहीम सलग 20 वर्षे यशस्वीरीत्या राबवत आहे. यंदाचे मोहिमेचे 21वे वर्ष आहे. सलग 21 वर्षे अविरतपणे चालू असलेल्या या मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक झाले. प्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे विशेष कौतुक केले. 12 मार्चला दिवसभर ही मोहीम राबवण्यात आली.

Alandi : डॉ. धनंजय मुंडे यांनी पीएचडी पदवी संपादन केल्याने आळंदी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

नागरिकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे मोहिमस्थळी (Pune) उपस्थित कार्यकर्ते अधिक उत्साही होते. या मोहिमेत 50 हून अधिक धर्मप्रेमी स्वतःहून सहभागी झाले. खडकवासला पाटबंधारे विभाग, स्थानिक पोलीस प्रशासन, पुणे महापालिका आणि सर्व हितचिंतकांचे मोहिमेला पुष्कळ सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.