Pimpri : बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयाचा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या (Pimpri) वतीने पिंपरी न्यायालयाचा 34 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा सायन्स पार्कच्या सभागृहात बुधवारी (दि. 8) पार पडला.

यावेळी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ, पुणे अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. केतन कोठावळे, पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा अॅड. जयश्री कुठे, सचिव अॅड. गणेश शिंदे, महिला सचिव प्रमिला गाडे, माजी नगरसेविका अॅड. गीता मंचरकर, अॅड. प्रतिमा तोरपे, माजी नगरसेविका अॅड. उर्मिला काळभोर, अॅड. अल्पना रायते, पुणे अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. पांडुरंग थोरवे मंचावर उपस्थित होते.

Pune : रंगपंचमीलाही खडकवासला जलाशयाचे हिंदु जनजागृती समितीतर्फे मानवी साखळीद्वारे रक्षण

पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे सह सचिव अॅड.मंगेश नढे, खजिनदार अॅड. विश्वेश्वर काळजे, हिशोब तपासणीस अॅड. राजेश रणपिसे, सदस्य अॅड. अक्षय केदार, अॅड. स्वप्नील वाळुंज, अॅड. सौरभ जगताप, अॅड. नितीन पवार, अॅड. प्रशांत बचुटे, अॅड. पवन गायकवाड, माजी पदाधिकारी (Pimpri) आदी उपस्थित होते.

भोसरी येथे इंद्रायणी थडी जत्रेत पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने मोफत कायदेशीर सल्ला केंद्र चालविण्यात आले. यात शेकडो नागरिकांनी मोफत कायदेशीर सल्ला घेतला. त्यात सल्ला देण्याचे काम केलेल्या विद्यार्थिनींचा या कार्यक्रमात यथोचित सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे संयोजन अॅड. मंगेश खराबे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.