Pune : बंडखोर आमदारांना 85 वर्षाचे नागरिक जाब विचारत आहेत – अजित पवार

एमपीसी न्यूज : मागील आठ महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांचा (Pune) एक गट करून उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपसोबत जात शिंदे फडणवीस सरकारची स्थापना केली. त्या घटनेला आठ महिन्याचा कालावधी होऊन गेला. मात्र, या दरम्यान शिंदे गटातील आमदार आणि खासदारावर ठाकरे गटातील नेतेमंडळी दररोज टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता त्याच दरम्यान खासदार धैर्यशील माने आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू या नेत्यांना नागरिक अडवून तुम्ही उद्धव ठाकरेना का सोडले, गद्दारी का केली? असा जाब विचारतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत.

त्याच घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्यातील कार्यकर्त्यांच्या धागा पकडत म्हणाले की, महाविकास आघाडीच सरकार गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना सोडून काही आमदार दुसर्‍या बाजूला गेले आहेत.

Pimpri : बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयाचा वर्धापन दिन साजरा

त्या खासदार, आमदारांना 85 वर्षाचे नागरिक थांबवून जाब विचारत आहेत. सर्व सामान्य नागरिकांच्या मनामध्ये एकदा गेले की गेले. ते कोणाच्याही हातामध्ये राहत नाही. त्यामुळे ज्या लोकांनी चुका केल्या आहेत. ते लोक आता अनुभव घेत आहेत. अशा शब्दात शिंदे गटातील आमदारांना त्यांनी टोला लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.