Pune : नोकर भरती पुण्यात जाहिरात मात्र बिहारमध्ये; पुण्यात मनसेकडून तीव्र आंदोलन

एमपीसी न्यूज- शिवाजीनगर ते हिंजवडी या (Pune ) मार्गावरील मेट्रोसाठी कामगारांची भरती केली जाणार आहे. मात्र या भरतीची जाहिरात बिहारमधील वृत्तपत्रात देण्यात आली आहे. याचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मेट्रो प्रशासन आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण च्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. स्थानिकांना नोकरीपासून वंचित ठेवत बिहारच्या तरुणांना रोजगार का देता असा सवाल या आंदोलनाच्या माध्यमातून विचारण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यात सध्या मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तर दुसरीकडे शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील मेट्रोचे काम देखील वेगाने सुरू आहे. या मार्गावर मेट्रोसाठी लागणाऱ्या विविध पदांवर मनुष्यबळ घेतलं जाणार आहे. यासाठीची जाहिरात मात्र बिहारमधील वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्याचा आरोप मनसेने केला आहे. याचाच निश्चित करत मनसेकडून आंदोलन करण्यात आले.

औंध येथील पीएमआरडीएचा कार्यालयासमोर मनसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी पीएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यात मेट्रो प्रकल्प राबवित असताना स्थानिकांना रोजगार देणार असल्याचे राज्य सरकार आणि मेट्रो प्रशासनाने सांगितले होते. मात्र राज्य सरकार आणि मेट्रो प्रशासनाला याचा विसर पडला का असा सवाल या आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात (Pune )आला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.