Khadakwasla Dam: खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रातील विसर्ग केला कमी 

एमपीसी न्यूज: खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. धरणात सुरू असणारा 8 हजार 132 क्यूसेक विसर्ग कमी करून आज सकाळी 10.00 वा. 5564 क्यूसेक्स करण्यात येत आहे. (Khadakwasla Dam) असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि दक्षता घ्यावी. असेही भंडलकर यांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.