Pune : धुक्यामुळे सुटले गाडीवरील नियंत्रण; कार बुडाली धरणात, दोघांचा मृत्यू तर एकजण बेपत्ता

एमपीसी न्यूज : वर्षासहलीसाठी महाडला निघालेल्या तरुणांच्या (Pune) कारचा अपघात झाला असून यामध्ये दोन एका तरुणाचा आणि त्याच्या मैत्रिणीचा मृत्यू झाला. तर अद्याप एकजण बेपत्ता असून त्यांचा चौथा मित्र मात्र अपघातात बचवला आहे. पुण्यातील वरवंड गावात शनिवारी पहाटे भोर-महाड रस्त्यावरील नीरा-देवघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये त्यांची कार बुडाली. यामध्ये मृत्यू झालेला एक तरुण आयटी व्यावसायिक आहे, तर त्याच्या मैत्रिणीचाही बुडून मृत्यू झाला आहे.   

अक्षय रमेश धाडे (वय 27, रा. रावेत) आणि हर्षप्रीत हरप्रीतसिंग बंबा (वय 30, रा. पाषाण) अशी मृतांची नावे आहेत. तर त्यांचा  मित्र स्वप्नील परशुराम शिंदे (वय 27, रा. हडपसर) हा अद्याप बेपत्ता आहे.

अपघातात जखमी झालेल्या संकेत वीरेश जोशी (वय 28, रा. पाषाण) याने या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला.

एफआयआरनुसार, संकेत जोशी हा बाणेर येथील एका आयटी कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतो. या आधी संकेत जोशी, अक्षय धाडे आणि स्वप्नील शिंदे यांनी एका कंपनीत एकत्र काम केले होते. तेव्हापासून त्यांची मैत्री होती, तर मूळची मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी असलेली हर्षप्रीत ही धाडेची मैत्रीण होती.

Alandi : डोळे लागणच्या पार्श्वभूमीवर घरोघरी सर्वेक्षण; धोका टळला तरी रुग्णांची वाढ

शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास हे चौघेजण कोकणात महाड येथे वर्षासहलीसाठी (Pune) निघाले. धाडे गाडी चालवत होता. सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास भोर महाड महामार्गावर वरवंड येथे गाडी वळण घेत असताना धुके आणि पावसामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि नीरा-देवघर धरणाच्या मागील पाण्यात त्यांची कार सुमारे 200 फूट खाली कोसळली.

या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर बेपत्ता असलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे.  घटनेची माहिती मिळताच सह्याद्री रेस्क्यू फोर्स आणि भोईराज जल आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.