Pune News : लॉयला व सेंट व्हिन्सेंट यांच्यात विजेतेपदासाठी लढत

एमपीसी न्यूज : यजमान लॉयला आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी (Pune News) सेंट व्हिन्सेंट यांच्यात शुक्रवारी पाषाण येथील लॉयला प्रशालेच्या मैदानावर टाटा ऑटोकॉम्प संचालित लॉयला फुटबॉल चषक स्पर्धेतील विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

एक्स लोयोला स्टुडंट्स नेटवर्क (ELAN) द्वारे आयोजित या स्पर्धेचा उपांत्य फेरीचा निकाल तिन्ही विभागांमध्ये (12, 14, 16 वर्षांखालील) लॉयला विरुद्ध सेंट व्हिन्सेंट यांच्यातच अंतिम सामना होणार आहे

12 वर्षांखालील उपांत्य फेरीत सेंट व्हिन्सेंटने अंश लोढा याच्या कामगिरीच्या जोरावर (18वा, 36वा) विद्या भवन वर 5-0 असा विजय मिळविला. प्रणव मोटवानी (आठव्या) याने स्कोअरलाइनमध्ये भर टाकण्यापूर्वी सम्येक भंडारी (प्रथम) आणि अझलन लांडगे (31व्या) याने गोलसंख्या पूर्ण केली.

Pimpri News : शास्तीकर माफीची घोषणा हा चुनावी जुमला – सचिन भोसले

अन्य उपांत्य फेरीत, लॉयलाने अनुराग पारसनिस (12 व्या) याच्या एकमेव गोलाच्या जोरावर जे.एन. पेटिट संघाला 1-0 असे पराभूत केले.

14 वर्षांखालील विभागात यजमान लॉयलाने विद्या व्हॅलीला 1-0 ने असे हरविले त्याचे श्रेय अनय डुंबल (45 व्या) याच्या गोलास द्यावे लागेल तर सेंट व्हिन्सेंटने देव कांबळे (18 व्या) याच्या गोल मुळे ब्लू रिज पब्लिक स्कूल 1-0 असा रूमवर्षक विजय नोंदविला.

16 वर्षांखालील विभाग लॉयला एचएसने जेएन पेटिट एचएसचा 2-1 असा संघर्ष पूर्ण लढतीनंतर पराभव केला. अरुण रावत (15 वे) याने लॉयला संघास 1-0 अशी आघाडी आघाडी मिळवून दिली. परंतु जेएन पेटिट एचएसच्या सिद्धांत इंगवले (32 वे) याने 1-1 अशी बरोबरी साधली. अखेर धीर परमार (47 व्या) याने लॉयला संघास विजय मिळवून दिला.

सेंट व्हिन्सेंटच्या एचएसने विद्या व्हॅलीला 2-0 असे पराभूत केले त्यावेळी त्यांच्याकडून अॅरॉन डिसोझा (20 वा) आणि ऋषभ जाधव (32 वे) यांनी गोल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.