Pune Metro : दिवाळीत पावणे दोन लाख पुणेकरांनी केला मेट्रोने प्रवास

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना (Pune Metro) जोडणारी सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून मेट्रो नावारूपास येत आहे. दिवाळीच्या कालावधीत मेट्रोने एक लाख 74 हजार प्रवाशांनी प्रवास केला असून मेट्रोला त्यातून 35 लाख 86 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

एका शहरातून दुसऱ्या शहरात काम, शिक्षण आणि इतर कारणांनी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून प्रवास करण्याएवजी अनेकजण मेट्रोच्या एसी प्रवासाला पसंती देत आहेत. सुखकर, आरामदायी आणि कमी वेळेत प्रवास होत असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिक मेट्रोची सफर करतात.

Moshi : तमाशा कला म्हणून वाईट नाही!” – सोपान खुडे

दिवाळीच्या 10 ते 15 नोव्हेंबर या सहा दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते सिव्हील कोर्ट या लेनवर 81 हजार 681 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यात 13 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक 20 हजार 874 जणांनी मेट्रोची सफर केली.

तर वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गावर 93 हजार 221 प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केला. या लेनवर देखील 13 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक 24 हजार 124 जणांनी मेट्रोचा प्रवास केला. तर दोन्ही लेनवर लक्ष्मी पुजनाच्या दिवशी (12 नोव्हेंबर) सर्वात कमी प्रवाशांची संख्या नोंदवली गेली. दोन्ही लेनवर सहा दिवसात 35 लाख 86 हजार 719 रुपयांचा महसूल मेट्रोला मिळाला आहे.

मेट्रो फिडर सेवा – Pune Metro

मेट्रो स्थानकावरून आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी पीएमपीएमएलच्या समन्वयाने फिडर सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरातून नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. याचा मेट्रोची प्रवासी संख्या वाढण्यावर सकारात्मक परिणाम होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.