Pune News : नवले पुल हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील अतिक्रमण व सेवा वाहिन्या काढून घेण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय महामार्ग क्रमाक 4 वरील खेड शिवापूर -नवीन कात्रज बोगदा -नवले पूल- वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनाधिकृतपणे करण्यात आलेले (Pune News)अतिक्रमण तसेच सेवा वाहिन्या 7 दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. 

मिळकतधारकांनी अनाधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विनापरवाना बांधकाम मुदतीत काढून न घेतल्यास ती दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अँड ट्राफिक) ॲक्ट 2002 अन्वये पाडण्यात येतील तसेच त्याचा खर्च व दंड संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

Wakad News : मोटरसायकल वरून आलेल्या अनोळखी इसमाने आयफोन हिसकावला

प्राधिकरणाच्यावतीने ही अतिक्रमणे काढताना, सेवा रस्त्याची सुधारणा करताना काही नुकसान, असुविधा झाल्यास याला प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पुणे येथील प्रकल्प संचालक संजय कदम यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमाक 4 वरील नवले पुलावर गेल्या 1 महिन्यात मोठे अपघात झाले आहेत. त्यामध्ये जीवित हानी व वाहनांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.(Pune News) बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या  खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.