Pune : राष्ट्रवादीचे अशोक टेकवडे यांचा जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या (Pune) उपस्थितीत पुरंदर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर,  बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला राज्यभरातून तब्बल 1200 हून अधिक पदाधिकारी सहभागी झाले आहे. त्याच दरम्यान मागील कित्येक महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अशोक टेकवडे भाजपमध्ये जाणार का? ही चर्चा सुरू होती.

Moshi : क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची 27 लाखांची फसवणूक

या (Pune) चर्चेला आज अखेर पूर्णविराम मिळाला असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत अशोक टेकवडे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता येणार्‍या काळात अशोक टेकवडे यांना भाजप काय जबाबदारी देते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.