Pune News : रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

एमपीसी न्यूज : प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे, डॉ अजित शिंदे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे संजीव भोर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने रस्ता सुरक्षा अभियान 2023  (Pune News) अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी राजीव गांधी अकॅडमी ई लर्निंग स्कूल पर्वती दर्शन पुणे येथे पार पडला.

नटसम्राट विजय तेंडुलकर सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला संजीव भोर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे, विजय सावंत वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक पुणे, रणजीत मगर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे, सतीश माळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे, विलास आपटे कार्याध्यक्ष मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य, अमित बागुल युवा नेते, राजू घाटोळे अध्यक्ष मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य, रूपाली कदम मुख्याध्यापिका राजीव गांधी अकॅडमी ई लर्निंग स्कूल, सातारा रोड विभागाचे अध्यक्ष सुनील भिसे, पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे उपाध्यक्ष वीरेंद्र आंबेटी, अनिल भिसे संचालक भिसे मोटर्स स्कूल, अर्चना इरकल सातारा रोड महिला विभाग, राजेश इरकल संचालक राजेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल कात्रज पुणे 46, विवेक माळवदे संचालक चंद्रकांत मोटर ड्रायव्हिंग स्कूल धनकवडी पुणे 43, आयुष मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक धनकवडी पुणे रूपाली बोरकर, संचालिका राधा मोटार ड्रायव्हिंग स्कूल धनकवडी पुणे 43, पुणे शहर उपाध्यक्ष निलेश गिरी, कात्रज विभाग प्रमुख सचिन गुंड, अवधूत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, अवधूत डॉक्टर ड्राईव्ह ड्रायविंग स्कूलचे संचालक गवारे, भरत मोटार ड्रायव्हिंग स्कूल दत्तनगर संचालक भरत गायकवाड, वसंत कुमार भाटिया, लालू कदम, महेश ढवळे, संतोष कपटकर, प्रशांत बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

PCMC : महापालिका ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करणार 

या कार्यक्रमाचे आयोजन विनायक ड्रायव्हिंग स्कूल सहकार नगर पुणे 9 यांनी केले कार्यक्रमासाठी विजय तेंडुलकर सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय आबासाहेब बागुल व अमित बागुल युवा नेते यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू घाटोळे यांनी केले. (Pune News) या प्रसंगी संजीव भोर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे, अमित बागुल युवा नेते विजय सावंत, मोटर वाहन निरीक्षक पुणे विलास आपटे, संचालक आपटे मोटर ड्रायव्हिंग स्कूल या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या चिन्हांचे हँडबिल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.  आभार प्रदर्शन वीरेंद्र आंबेटी वीरेंद्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल पुणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत व पाठिंबा विजय सावंत,वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक पुणे यांच्यामुळे शक्य झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.