Pune News : रास्त भाव दुकान परवान्यासाठी महिला बचत व स्वयंसहाय्यता गटांना अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 1 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयाद्वारे रद्द केलेली व राजीनामा दिलेली रास्त भाव दुकान परवाने गटांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे कार्यक्षेत्रातील गटांना रास्त भाव दुकाने परवाने मंजूर करण्यासाठी इच्छूक महिला बचत गट व स्वयंसहाय्यता गटांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 10 सप्टेंबर 2021 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन अन्न वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

विहित नमुन्यातील कोरे फॉर्म रक्कम पाच रुपये इतके शुल्क संबंधित परिमंडळ कार्यालयात जमा केल्यानंतर दिले जाणार आहे. प्रत्येक रास्त भाव दुकान परवाना मिळणेसाठी अर्जदार यांनी स्वतंत्र फॉर्म भरणे आवश्यक आहे. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, अटी व शर्तीबाबत व इतर अनुषंगिक माहिती परिमंडळ कार्यालयात व अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध असणार आहे.

 

रास्त भाव दुकाने मंजूर करण्याचे ठिकाण

परिमंडळ विभाग व मंजूर करायचे स्वस्त धान्य दुकानाचे कार्यक्षेत व संख्या पुढील प्रमाणे

ब – गुलटेकडी (डायस प्लाॅट) – स्वस्त धान्य दुकान 1, ड विभाग 1) केशवनगर, 2) टिळेकर नगर-गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे, 3) गोंधळेनगर, सातववाडी, हडपसर स्वस्त धान्य दुकान -3, ई विभाग शांतीनगर – स्वस्त धान्य दुकान 1, फ विभाग 1) कुदळवाडी, 2) चिखली गावठाण, घरकुल, नेवाळे वस्ती, 4) संत तुकारामनगर, मासुळकर काॅलनी, अजमेरा वस्त्रगद्योग काॅलनी, 5) तळवडे गाव (त्रिवेणीनगर, सहयोग नगर) 6) भोसरी (गव्हाणे वस्ती), स्वस्त धान्य दुकान – 6. ज विभाग 1) दापोडी, 2) भाटनगर, 3) मोहननगर, 4) नाणेकर चाळ, 5) गांधीनगर- स्वस्त धान्य दुकान 5, ल विभाग – केळेवाडी (कोथरूड) स्वस्त धान्य दुकान 1. म विभाग 1 बावधन खुर्द, 2) कोंढवे धावडे, 3) खामगाव मावळ, 4) खडकवासला, 5) नांदोशी, 6) कुडजे – स्वस्त धान्य दुकान 6.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.