Sangvi Crime News : इंस्टाग्राम प्रोफाइलवर अल्पवयीन मुलीचा फोटो ठेवत अश्लील व्हिडीओ पाठवल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर अल्पवयीन मुलीचा फोटो ठेवून त्या अकाऊंटवर अश्लील फोटो व व्हिडिओ पाठविले. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान घडला.
यश भिंगे (वय 25, पत्ता माहीत नाही), असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने या प्रकरणी सोमवारी (दि. 9) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोरील दुकानाच्या बाहेर थांबून फिर्यादीकडे वाईट नजरेने बघून हाताने वाईट इशारे करून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच इंस्टाग्रामवर अकाउंट तयार करून त्या अकाऊंटच्या प्रोफाईलला फिर्यादी अल्पवयीन मुलीचा फोटो ठेवून फिर्यादीच्या वडिलांचा मोबाईल नंबर अपलोड केला. त्यानंतर त्या अकाउंटवर महिलांचे काही अश्लील फोटो व व्हिडिओ पाठविले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.