Pune News : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत 14 जून रोजी मोफत चर्चासत्र

एमपीसी न्यूज – शलाका फाऊंडेशनच्या किस्टोन (Pune News) स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, पुणे यांच्या वतीने ‘ अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2023’ या विषयावर मोफत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे हे चर्चासत्र होणार आहे. प्रा. यशोधन सोमण, प्रा.केदार टाकळकर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

Pimpri :  शिंदे-फडणवीस सरकारने वारकऱ्यांची माफी मागावी; आपची मागणी

अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्यात 1 लाख 25 हजार जागा आहेत, मात्र इच्छूक विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाखाच्या आसपास असल्याने चुरस निर्माण होते. मेकॅनिकल, काँम्प्युटर, इटीसी, आर्टीफिशियल इंटेलिजन्स्, डाटा सायन्स, मशीन लर्निंग यातून निवड करताना संभ्रम निर्माण होतो. प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांची आवश्यकता याबाबत चर्चासत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे. 9922887755 या दूरध्वनी क्रमांकावर अधिक माहिती साठी संपर्क साधता (Pune News) येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.