Pune News : वीज कामगारांच्या संपानंतर कंत्राटी कामगारांच्या कायम नोकरीसाठी सरकार योजना बनविणार : देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंत्राटी कामगारांना कायम नोकरी सामावून घेण्याकरिता योजना बनविणार (Pune News) ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना कायम करा या मागणीचे पत्र कृती समितीने शासनाला दिले होते.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री .देवेंद्र फडणवीस, यांनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या मिटिंग मध्ये तिन्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, प्रधान सचिव ऊर्जा,  संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे उपस्थित होते. यासाठी वीज ऊद्योगातील कंपनी चे खाजगीकरण, संमांतर वीज परवाना, भांडुप झोन महावितरण करिता अदानी पॉवरने मागीतलेला संमांतर परावाना या करिता संयुक्त संघर्ष कृती समिती व्दारे विविध ठिकाणी मोर्चा व आंदोलन करण्यात आले होते.

या सकारात्मक चर्चेनंतर चर्चा संपताच तातडीने संप मागे घेण्यात आल्याची घोषणा कृती समितीच्या वतीने बैठकीत जाहीर करण्यात आले आहे.या बैठकीमध्ये संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे,कोषाध्यक्ष सागर पवार,संघटनमंत्री उमेश आणेराव, उप महामंत्री राहूल बोडके, पुणे प्रादेशिक कार्यालयाचे अध्यक्ष संतोष अंबड, पुणे झोन संघटनमंत्री सुधीर जगताप (Pune News) उपस्थित होते.

Pune News : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी शिवाजीरोड वाहतूकीसाठी राहणार बंद

कंत्राटी कामगार संघाचे हजारो कामगार बुधवारी (दि.4)  आयोजीत 72 तासाच्या सहभागी झाले होते..  आंदोलनास भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पाठिंबा दिला. ओरिसा राजस्थान, पंजाब च्या धर्तीवर या कामगारांना नोकरीत कायम सामावून घ्यावे या मागणीसाठी संघटनेने (Pune News)  मुंबई आझाद मैदान व नागपूर विधानसभेवर मोठ्या संख्येने मोर्चे काढला होता.

यावर तोडगा काढताना उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केले की, शासनानाचा असा कोणताही निर्णय नाही, सदर समांतर खाजगी परवाने बाबतीत संबंधित नोटीफीकेशन हे खाजगी कंपनी ने काढलेले असुन या बाबतीत आपल्या कडे असलेल्या आयुधांचा योग्य पध्दतीने वापर केला जाईल असे हमी दिलेली आहे.

कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत सामावून घेऊ त्या साठी विधी मंडळात चर्चा झाली असून, शिक्षण व वय या बाबत कंत्राटी कामगार संघासोबत स्वतंत्र चर्चा करून तोडगा काढु असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.