Pune News : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी शिवाजीरोड वाहतुकीसाठी राहणार बंद

एमपीसी न्यूज – अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यावेळी वाहतूक कोंडी होऊनये यासाठी मंगळवारी (दि.10) काही काळासाठी शिवाजी रोड हा ( Pune News) वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उप आयुक्त विजयकुमार मगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

अंगारक संकष्ट चतुर्थी दिवशी दर्शनासाठी अनेक भाविक दगडू शेठ मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात यावेळी रोडवरील वाहतुकीने भाविकांना पायी परिसरात फिरणे कठीण होते, तसेच वाहतूक कोंडी देखील होते. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी मंगळवारी गर्दी संपर्यंत शिवाजीरोड परिसरात (Pune News) अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) वगळता आवश्यकतेनुसार व वेळेनुसार पी.एम.पी.एम.एल. च्या बसेस, चारचाकी व जड वाहने यांना गर्दी संपेपर्यंत बंद करण्यात येणार आहे.

Pune News : कुचीपुडी नृत्य सादरीकरणाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद 

तसेच आवश्यकता वाटल्यास चारचाकी व दुचाकी वाहनांवर लाल महाल चौकापासून पुढे निर्बंध घातले जातील. वाहतुकीची परिस्थिती पाहून हे बदल केले जाणार आहेत. तरी नागरिकांनी पुढील पर्यायी मार्गांचा वापर करावा

 

पुरम चौकातून बाजीराव रोडवरुन शिवाजीनगर कडे जाणा-या वाहन चालकांनी पुरम चौकातुन टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ सी रोडने इच्छितस्थळी जावे.

 

 शिवाजी रोड वरुन स्वारगेटला जाणारे वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक टिळक चौक- टिळक रोडने इच्छितस्थळी जावे.

 

 स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

 

 अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणा-या वाहन चालकांनी बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी (Pune News) केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.