Pune News : कुचीपुडी नृत्य सादरीकरणाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद 

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित कुचीपुडी  या एकल नृत्य  कार्यक्रमाला रसिकांनी दाद देत ( Pune News )नृत्याचा आनंद घेतला.

कासी यांनी पारंपारिक रचनांवर नृत्य प्रस्तुती केली आणि रसिक भारावून गेले.’जयमू, जयमू ‘… या नटराज नृत्याने प्रारंभ झाला. हंस ध्वनी रागाच्या संगीत पार्श्वभूमीवर हे बहारदार नृत्य सादर झाले. कालीया नागावरील ‘तरंगम्’  कृष्ण नृत्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जावली नृत्य, गोपी संवाद, आणि तिल्लाना सादर करुन त्यांनी मने जिंकली.डॉ. परिमल फडके यांच्यासह आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  149 वा कार्यक्रम  होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कासी आयसोला यांचा सत्कार केला.

Pune News : हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमीत्त हडपसर येथे दुचाकी रॅली

भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे शनिवार, (दि.7) सायंकाळी सहा  वाजता हे नृत्य सादरीकरण झाले. परिमल परफॉर्मिंग आर्टस् अँड रिसर्च सेंटर च्या प्रस्तुत या कार्यक्रमात कासी आयसोला (अमेरिका) यांनी बहारदार ( Pune News ) एकल नृत्य सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.