Pune News : हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त हडपसर येथे दुचाकी रॅली

एमपीसी न्यूज – हडपसर येथे होणाऱ्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त शनिवारी (दि.7) दुचाकी रॅली (Pune News) काढण्यात आली. यावेळी  भगवे ध्वज, पारंपरिक वेशात, घोषणा अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी चौकांमध्ये  पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले.

हि सभा आज (रविवारी) सायंकाळी सहा वाजता कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाचे मैदान, काळेबोराटेनगर (काळेपडळ), हडपसर येथील मैदानात हिंदु राष्ट्र-जागृती सभा होणार आहे. सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट,रणरागिणी शाखेच्या.भक्ती डाफळे हे सभेला संबोधित (Pune News) करणार आहेत.

Pimpri news : सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

या फेरीवेळी संस्थापक अध्यक्ष पप्पाजी पुराणिक, प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष ओम जयशंकर, ब्रह्म महाशिखर परिषद (भारत) आणि ह भ प दत्तात्रय तुकाराम चोरघे,अखिल भारतीय वारकरी मंडळ सदस्य आणि चिंतामणी प्रासादिक दिंडी ( देहू ते पंढरपूर – तुकोबाराय दिंडी,) खजिनदार यांचे हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून रॅलीला सुरुवात झाली.

ससाणेनगर – काळेबोराटे नगर रस्ता – जनसेवा बँक कॉलनी – तुकाई टेकडी चौक मार्गाने निघालेल्या फेरीचा समारोप कै. मारुतराव काळे शाळेचे मैदान, काळेपडळ, हडपसर, पुणे येथे सांगता सभेने झाला. हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले आणि रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे (Pune News) आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.