Maval News : महिंद्रा कंपनीच्या आवारात आढळला बिबट्या

एमपीसी न्यूज – कान्हे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वेअर हाऊसच्या आवारात बिबट्या (Maval News) आढळला. कंपनीच्या आवारात बिबटयाचा वावर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे काम सुरू आहे.

बिबट्या वेअर हाऊसमध्ये आल्याचे लक्षात येताच एच आर मॅनेजर विजय पवार यांनी सीसीटीव्ही फूटेज च्या माध्यमातून व्हीडीओ क्लीप काढून सरपंच विजय सातकर व पोलीस पाटील शांताराम सातकर यांना पाठवून नागरीकांना याबाबत माहिती दिली. लागलीच घटनास्थळी (Maval News) सरपंच विजय सातकर व पोलीस पाटील शांताराम सातकर व ग्रामस्थ हजर झाले.

Pune News : वीज कामगारांच्या संपानंतर कंत्राटी कामगारांच्या कायम नोकरीसाठी सरकार योजना बनविणार : देवेंद्र फडणवीस

या घटनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेता सरपंच विजय सातकर यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वन विभाग अधिका-यांना कळविल्याचे सांगितले.

बिबट्या दिसून आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना दक्ष व सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याच्या विभागामार्फत उपाय योजना करण्यात येत आहे. अशी माहिती कान्हे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच विजय सातकर (Maval News) यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.