Maval : कान्हे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – ग्रुप ग्रामपंचायत कान्हे येथील आंबेवाडी मधील(Maval )बहुउद्देशीय सभागृह,तळे सुशोभीकरण व शिवस्मारक पुतळ्याचे भूमिपूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या अश्वरूढ पुतळ्याचे शिवस्मारक तसेच तलावाच्या 20 गुंठे जागेमध्ये सुशोभीकरण असे सर्व मावळ तालुक्यातील मावळ्यांना प्रेरणादायी शिवस्मारक संपूर्ण मावळ तालुक्यात प्रथमच कान्हे गावामध्ये सुरू होत आहे.

या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मावळ तालुक्याचे (Maval )कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी मयुर ढोरे,किशोर पं सातकर,संदीप आंद्रे,प्रकाश आगळमे,सुजाता चोपडे,गिरीश सातकर,महेश सातकर,अश्विनी शिंदे, आशा सातकर,रुपाली कुटे,मनीषा ओव्हाळ,सोपान ज्ञानेश्वर धिंदळे,किशोर सातकर,सोनाली सातकर, बाबाजी चोपडे,संदीप नामदेव ओव्हाळ,आरिफ मुलाणी,रोहिणी चोपडे,पुजा चोपडे,ग्रामविकास अधिकारी संतोष शिंदेसह ग्रामस्थ, महिला भगिनी,युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचबरोबर कान्हे ग्रामस्थांच्या मागणीनुसार भविष्यकाळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी असे सभागृह, जिम,महिला योगा सेंटर व सार्वत्रिक कार्यक्रमांच्या उद्देशाने 350 ते 400 लोक बसतील अशा प्रशस्त हॉलचे महिलांना प्रशिक्षणासाठी, इतर सर्व प्रकारचे ट्रेनिंग साठी, विवाह सोहळा व वाढदिवसाच्या सार्वजनिक वापरासाठी एक अद्यावत सभागृह मौजे कान्हे – आंबेवाडी येथे उभारण्यात येणार आहे. आंबेवाडी येथील सिद्धिविनायक सोसायटी मधील अंबादास पाचपोर यांनी तीन एकर जागा ग्रामपंचायतीस बक्षीसपत्र करून,7/12 ग्रामपंचायतीच्या नावे करून दिला आहे.यासाठी सरपंच विजय वामन सातकर,सदस्य किशोर प्रभाकर सातकर व भाऊ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आहे.त्याबद्दल सरपंच विजय वामन सातकर व ग्रामपंचायत कान्हे यांच्या वतीने श्री.अंबादास पाचपोर यांचा सन्मान व आभार व्यक्त केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.