Raj Thackeray : “बाळासाहेबांनी व्यंगचित्रकार म्हणून वारसदार का म्हटलं, हे आता मला त्यांना विचारता येणार नाही : राज ठाकरे

एमपीसी न्यूज – मनसे प्रमुख राज ठाकरे यांना “तुमच्यात बाळासाहेबांनी असं काय पाहिलं की तुम्हाला व्यंगचित्रकार म्हणून वारसदार म्हटलं?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) हजरजबाबीपणाने “हे आता मला त्यांना विचारता येणार नाही,” असे  मिश्किलपणे उत्तर दिलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलेला पहायला मिळाला.

पिंपरी  येथे सुरू असलेल्या 18 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात ते आज (रविवारी) बोलत होते.

Maval News : महिंद्रा कंपनीच्या आवारात आढळला बिबट्या

बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याने मी डेव्हिड लो या ब्रिटिश व्यंगचित्रकारांना खूप फोलो केलं. मी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. व्यंगचित्र ही चित्रकलेतील शेवटची पायरी आहे. आधी नाक, कान, डोळे यांचा अभ्यास केल्याशिवाय व्यंगचित्र काढणं सोपं नाही,” असं मत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विचारलं.

Pune News : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी शिवाजीरोड वाहतुकीसाठी राहणार बंद

मी शाळेत असताना काही व्यंगचित्रं काढत असे. आम्ही ब्रशने काम करणारी लोकं आहोत. त्यामुळे त्यावेळी माझी ब्रशची लाईन असेल किंवा एखादी राजकीय कल्पना निर्माण करणं असेल हे त्यांनी सुरुवातीच्या काळात पाहिलं असेल. त्यातूनच ते बोलले असतील. मला जे शिकवलं ते माझ्या वडिलांनी आणि बाळासाहेबांनी, असं राज ठाकरे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.