Dapodi : जेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्याच्या मुलाचा हट्ट पूर्ण करतात…!

एमपीसी न्यूज – गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या मुलाचा भेटण्याचा हट्ट (Dapodi)  मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्याच्या घरी जात पूर्ण केला. त्यामुळे कुटुंबिय आनंदाने भारावून गेले.

दापोडीतील मनसेचे कार्यकर्ते विशाल देशपांडे यांच्या राज या नावाच्या मुलाला तीन महिन्यांपूर्वी मस्कुलर डिसट्रॉपी हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. मुलाने राज ठाकरे यांना भेटण्याचा बालहट्ट वडिलांकडे धरला. मुलाचा हट्ट कसा पूर्ण करायचा हे वडिलांना कोडे पडले. साहेबांपर्यंत कसे पोहोचायचा असा त्यांना प्रश्न पडला होता.

पुणे, पिंपरी-चिंचमधील मनसेच्या पदाधिका-यांना विशाल यांच्या मुलाच्या आजाराची माहिती मिळाली. तसेच मुलाला राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा असल्याचे समजले. नेत्यांनी याची कल्पना राज ठाकरे यांना दिली. तिस-यादिवशी ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या दापोडीतील घरी दाखल झाले.

Pimpri : पिंपरीतील दिव्यांग कल्याणकारी केंद्राचे काम संथ गतीने

मुलासाठी  खेळणी, खाऊ आणला. त्याच्यासोबत गप्पा मारल्या. मुलाने घातलेल्या पांढ-या झब्यावर स्वाक्षरी करुन दिली. ठाकरे यांनी घरी भेट देत इच्छा पूर्ण केल्याने देशपांडे (Dapodi) कुटुंबीय गहिवरुन गेले.

यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत  मनसे नेते अविनाश अभ्यंकर , किशोर जी शिदे , राजेंद्र वागसकर , रणजित शिरोळे व सचिन चिखले , राजु सावळे, विशाळ मानकरी , बाळा दानवले , रुपेश पटेकर , अश्विनी बांगर , सिमा बेलापुरकर , संगिता देशमुख , अनिता पांचाळ , सरीता बौत्रे , प्रिती सिंहपरदेशी , हेमत डांगे , अंकुश तापकीर , सचिन शिगाडे , अनिकेत प्रभु , सुरेश सकट , सुदिर जम , सुशिल सोनकांबळे, आप्पा आलेक्स , प्रविण माळी ,मनोज लांडगे आदी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.