Wakad : दुकानदाराकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज- दुकानदाराकडे  खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली (Wakad) आहे. मागील मे महिन्यापासून एका हाड वैद्य दुकानदाराकडे खंडणी मागत होते.

 या प्रकरणी आदिल जुबेर अहमद अन्सारी (वय 24 रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.22) फिर्यादी दिली आहे.यावरून पोलिसांनी शाकीर ताहीर सय्यद (वय 34 रा. साळुंब्रे,मावळ), इमरान इब्राहिम शेख (वय 35 रा थेरगाव), हाजी मलंग दौलत शेख (वय 27 रा चिखली) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Kasarwadi : गाढ झोपी गेलेल्या मुलाने तब्बल एक तासाहून अधिक काळ दरवाजा न उघडल्याने अग्निशमन दलाच्या सहकार्याने उघडण्यात आला दरवाजा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा काळेवाडी फाटा येथे अन्सारी हाड वैद्य दुकान  व्यवसाय आहे. येथे आरोपी जबरदस्ती घुसले व त्यांनी फिर्यादी यांना तुझा धंदा जोरात सुरू आहे. तुला येथे धंदा करायचा असेल तर आम्हाला दोनशे रुपये हप्ता द्यावा लागेल म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे त्यांनी महिन्याला दोनशे याप्रमाणे सहाशे रुपये हप्ता घेतला.

तसेच याबाबत पोलिसांना किंवा इतर कुणाला सांगितले तर दुकानासकट जाळून टाकू अशी धमकी दिली. तसेच हाताने  व पायाने मारहाण करून शिवीगाळ केली. आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी वाकड पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली . यावरून (Wakad) पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.