Kasarwadi : गाढ झोपी गेलेल्या मुलाने तब्बल एक तासाहून अधिक काळ दरवाजा न उघडल्याने अग्निशमन दलाच्या सहकार्याने उघडण्यात आला दरवाजा

एमपीसी न्यूज -गाढ झोपी गेलेल्या मुलाने तब्बल एक तासाहून अधिक काळ दरवाजा न उघडल्याने अग्निशमन दलाच्या सहकार्याने घराचा दरवाजा (Kasarwadi) उघडण्यात आला. ही कामगिरी मंगळवारी (दि. 22) सायंकाळी आठ वाजता कुंदननगर, कासारवाडी येथे करण्यात आली. यज्ञाश शितोळे (वय 10) असे मुलाचे नाव आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यज्ञाश मंगळवारी सायंकाळी शाळेतून आला. शाळेत खेळून तो दमला होता. त्यामुळे घरी आल्यानंतर तो बेडरूम मध्ये झोपी गेला. तो घरी आल्यानंतर त्याचे आई वडील भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेले. तासाभरानंतर आई-वडील घरी आले. त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र यज्ञाश आतून काहीच प्रतिसाद देत नव्हता. त्याच्या आई वडिलांनी आणि इतर नातेवाईकांनी तब्बल एक तासाहून अधिक काळ दरवाजा वाजवून यज्ञाशला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठला नाही.

Dagdusheth Ganapati : यंदा दगडूशेठ गणपती दुपारी 4 वाजता विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

बराच वेळ झाल्यानंतर वैभव जाधव यांनी आठ वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार लीडिंग फायरमन विकास नाईक, वाहन चालक अमोल चिपळूणकर, ट्रेनी फायरमन विकास कुठे, विकास सूर्यवंशी, संकेत शिंदे, पल्लवी पवार, मोनिका इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी डोअर ब्रेकरच्या सहाय्याने दरवाजा उघडला. आत जाऊन पाहणी केली असता यज्ञाश बेडरूममध्ये गाढ झोपी गेला होता. त्याने कानावर उशा आणि चादर घेतली होती. त्यामुळे दरवाजावर पडणारी थाप त्याला ऐकू आली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी यज्ञाशची सुखरूप सुटका (Kasarwadi) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.