Pimple Saudagar : संरक्षण विभागाच्या मोकळ्या जागेत गवताला आग

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील संरक्षण विभागाच्या मोकळ्या जागेत गवताला आग (Pimple Saudagar) लागली. ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी घडली.

पिंपळे सौदागर येथे संरक्षण विभागाच्या मोकळ्या जागेत गवत वाढले होते. या गवताला बुधवारी दुपारी आग लागली. गाडीमध्ये संपूर्ण गवत जळून गेले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

Chikhali : दिड किलो गांजासह तरुणाला चिखलीतून अटक

गवताला लागलेली आग पाणी मारून विझवण्यात आली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दरवर्षी या ठिकाणी (Pimple Saudagar) गवताला आग लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.