Pimpri : पिंपरीतील दिव्यांग कल्याणकारी केंद्राचे काम संथ गतीने

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात ( Pimpri) येत असलेल्या दिव्यांग कल्याणकारी केंद्राचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. चार मजली इमारतीचे काम पाच वर्ष होत आली तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरातील दिव्यांग बांधव अद्ययावत सोयी-सुविधांसह प्रशिक्षणापासून वंचित राहत आहेत.

मोरवाडी येथे दिव्यांग कल्याणकारी केंद्राच्या इमारतीचे कामकाज सुरू आहे. चार मजली इमारतीमध्ये 24 हजार चौरस फुटांचे बांधकाम ( Pimpri) आहे. बांधकामासाठी चार कोटी 68 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साडेतीन कोटी असे आठ कोटी रूपये दिव्यांग कल्याणकारी केंद्रावर खर्च केले जात आहेत. केंद्राचे काम पाच वर्षे होत आले तरी पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे शहरातील दिव्यांग बांधव सोयी-सुविधांपासून वंचित आहेत.

Chandrayan 3 – चांद्रयान-3 लँडिंग होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन

शहरात  आठ हजार दिव्यांग बांधव आहेत. यामध्ये बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या नागरिकांचा समावेश आहे. दिव्यांगामध्ये विविध 21 प्रकार आहेत. या सर्वांवर केंद्रामध्ये लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बौद्धिक अपंगत्व, अंधत्व शिकण्याची अक्षमता , मानसिक आजार, कुष्ठरोग, श्रवणदोष, कमी दृष्टी, सेरेब्रल पाल्सी, बौनेत्व, स्नायू डीस्ट्रोफी, बहिरे अंधत्व, भाषण आणि भाषा कमजोरी, ऑटीझम सेप्ट्रम डीसऑर्डर, एकाधिक अपंगत्व आणि विकासात्मक विलंब यांचा समावेश असणार आहे.

उपचारात्मक शिक्षण

डोळे तपासणी, भाषा संवाद रूम, संभाषण उपचार, समुपदेशन कक्ष, संगीत उपचार अशा वेगवेगळ्या माध्यमातून दिव्यांग बांधवांवर उपचार केले जाणार आहेत. विविध उपचारात्मक शिक्षण दिले जाणार आहे. व्यावसायिक व उद्योग प्रशिक्षण देण्यासाठी विशेष केंद्र असणार आहे. व्यक्तिमत्त्व विकास, अत्याधुनिक रूम तसेच, विविध केंद्र व कक्ष असणार आहेत.

दिव्यांग केंद्राचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे.जुलै अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांवर उपचार करून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातून दिव्यांग बांधवांची उन्नती साधण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी ( Pimpri) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.