Pimpri News : संशोधन क्षेत्रात जगामध्ये सर्वाधिक संधी जपानमध्ये  – संदीप पुराणे

एमपीसी न्यूज – मराठी युवक-युवतींनी परदेशी भाषा निवड करताना जपानी किंवा जर्मनी भाषा निवडावी कारण जगाच्या तुलनेत संशोधन क्षेत्रात जपानमध्ये सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याची माहिती जपानमधील संदीप पुराणे यांनी (Pimpri News)दिली.

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे सुरु असलेल्या 18 व्या जागतिक मराठी संमेलनाचे ‘समुद्रापलीकडे भाग-2’ या कार्यक्रमात ते बोलत होते. छाया पाटील (अमेरिका), असंत गोविंद (मॉरिशस), जगदीश गायकवाड, ब्रायन परेरा (ऑस्ट्रेलिया), हेमा राचमाले (अमेरिका) हे मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, महेश केळुसकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
जपानमध्ये साडेतीन लाख जागा संशोधन केंद्रात रिकाम्या असून सर्वाधिक संधी या देशात खुलावत (Pimpri News)असल्याची माहिती संदीप पुराणे यांनी दिली.
   विद्यार्थ्यांनी बहुभाषिक असणे गरजेचे असल्याच्या मतावर सर्व वक्त्यांनी विशेष भर दिला. मायभूमीला न विसरता अमेरिका असो की ऑस्ट्रेलिया येथे ‘मराठी शाळा’ हा उपक्रम सुरु केला असून मराठीचा जागर तेथे फुलविण्यात विशेष आनंद होत असल्याचे छाया पाटील(अमेरिका) व हेमा राचमाले (अमेरिका) यांनी नमूद केले.
परदेशातील प्रगती व यश मिळवले तरी आपल्या गावी सामाजिक बांधिलकी आम्ही जपली असल्याचे ब्रायन परेरा यांनी म्हटले. तर, माशांची निर्यात करताना खाद्यातून जगाशी संवाद साधता येतो असे, जगदीश गायकवाड यांनी स्पष्ट केले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी स्मृतिचिन्ह देऊन सर्वांचा यावेळी सत्कार (Pimpri News) केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.